१. संगीत : गायन,वादन आणि नृत्य यांच्या एकत्रित कलेला "संगीत" असे म्हणतात.
२. ताल : एक विशीष्ठ बोल समूह ज्याची रचना टाळी,सम,काल आणि खंड यांची निश्चिती करून तयार केली जाते त्याला "ताल" असे म्हणतात.
३. सम : कोणत्याही तालाच्या "पहिल्या मात्रेस" सम म्हणले जाते. टाळी ही सर्वसामान्यपणे समेवर असते.
४. टाळी : ताल हा खंडांमद्धे विभागलेला असतो. ताल हातावर देताना स्वतंत्रपणे खंड दाखवायचा झाल्यास "टाळी" चा उपयोग केला जातो. सामान्यपणे प्रत्येक खंडाच्या पहिल्या मात्रेस टाळी येते. (कालाच्या सोडून)
५. काल : ताल हा सम भागात विभागलेला असतो साधारणपणे अर्धा ताल संपल्यावर येणार्या पहिल्या मात्रेस "काल" म्हणतात. हात टाळी च्या ऐवजी एका बाजूला हवेत फिरवून काल दर्शवतात.
६. लय : दोन मात्रांमधील समान अंतरास "लय" असे म्हणले जाते. लयीचे ३ प्रकार आहेत
१. विलंबित २. मध्य ३.द्रुत
७. खंड : वर सांगितल्या प्रमाणे ताल हा सम भागात विभागला जातो. त्या प्रत्येक भागात काही बोलांचा अपूर्ण समूह असतो त्या प्रत्येक समुहास "खंड" असे म्हणतात. खंड हे मात्राना अनुसरून बनवले जातात.
८. मात्रा : मात्रा म्हणजे "ताल मोजण्याचे" साधन. प्रत्येक तालामध्ये असलेल्या बोलाला "मात्रा" म्हणतात.
९. तिहाई : कोणताही बोल समूह एका आवर्तनामध्ये ३ वेळा वाजवल्यास त्याला "तिहाई" म्हणतात. सामान्यपणे तिहाई चा शेवट "धा" वर होतो.
१०. कायदा : विशीष्ठ बोलांची रचना जी मात्रा,टाळी, काल,खंड यांना अनुसरून बनवली जाते त्याला "कायदा" असे म्हणतात.
११. आवर्तन : कोणताही ताल अथवा बोल समूह सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाजवला अथवा म्हणला तर ते एक "आवर्तन" मानले जाते.
१२. दुप्पट : प्रत्येक ताल किंवा ठेका एका लयीत वाजवला जातो. त्याचा लयीमध्ये एका मात्रेच्या वेळात २ मात्रा वाजवणे याला "दुप्पट" म्हणतात.
(टीप: कृपया आपल्याकडे काही माहिती असल्यास अथवा काही बदल सुचवायचे असल्यास कमेन्ट मध्ये नमूद करा.)
संदर्भ आणि सौजन्य : १. ताल निनाद (श्री विजय किरपेकर) २. शास्त्रीय तबला गाइड (गोपाळ सखाराम आणि कंपनी मुंबई)
Where is नाद, स्वर, बोल, ठेका, किस्म, मुखडा, विभाग hey is not given please hey Vyakhya Patwa.
ReplyDeleteBol ki pari bhasha
ReplyDelete