तबला स्वराला लावणे ही एक अवघड गोष्ट मानली जाते. बर्याच जणांना तबला वाजवता येत असला तरी तो स्वराला लावता येत नाही. याचे कारण म्हणजे उपजतच स्वरज्ञाना चा अभाव. आपण कोणत्याही स्वराला तबला लावू शकतो. त्यासाठी पेटी वर स्वर चालू ठेवावा. स्वराला लावण्यासाठी तबल्याच्या लवेवर आघात करणे गरजेचे आहे. तबल्याच्या गठ्या वर वरच्या बाजूला आघात केला तर गठ्ठे खालच्या बाजूला सरकून तबल्याचा स्वर चढतो तर गठ्ठे वर घेतल्यास खालचा स्वर लागतो. पेटी आणि तबल्याच्या स्वराचा अंदाज घेऊन पुढील प्रक्रिया करावी. तबल्याची वादी जिथे बसवलेली असते त्यांना घरे म्हणतात. पहिल्यांदा कोणतेही एक घर निवडावे आणि स्वराला लावून घ्यावे. त्यानंतर त्याच्या अगदी विरुद्ध घर घेऊन ते स्वराला लावावे. नंतर परत दुसरे घर स्वराला लावून घ्यावे आणि त्याच्याही विरुद्ध घर स्वराला लावावे. असेच अनुक्रमे सर्व घरे स्वराला लावावीत. हातोडीने गजर्यावर हलका वार केल्यास किंचित फरक ही नाहीसा करता येतो.
तसेच डग्गा लावताना खर्ज चे ज्ञान असणे देखील आवश्यक आहे. खर्जा चा स्वर वाजवून अंदाज घ्यावा आणि डग्गा देखील स्वराला लावून घ्यावा. पहिल्यांदा च स्वराला लागेल याची शाश्वती थोडी कमीच. पण याचा ही सराव केल्यास अशक्य नाही.
(टीप: कृपया आपल्याकडे काही माहिती असल्यास अथवा काही बदल सुचवायचे असल्यास कमेन्ट मध्ये नमूद करा.)
संदर्भ आणि सौजन्य : १. ताल निनाद (श्री विजय किरपेकर) २. शास्त्रीय तबला गाइड (गोपाळ सखाराम आणि कंपनी मुंबई)
No comments:
Post a Comment