तबल्याचा इतिहास
भारतीय शास्त्रीय संगीतात तबल्याला मानाचे स्थान आहे पण तबला मुळात निर्माण कसा झाला याबाबत खात्रीशीर माहिती कुठेही उपलब्ध नाही. अनेक आख्यायिका तबल्याच्या निर्मिती विषयी सांगितल्या जातात. त्यातीलच एका प्रमुख आख्यायिकेनुसार मृदंग किवा पखवाजाचे कापून दोन भाग करण्यात आले व या दोन भागांचे तबल्यात परिवर्तन झाले. असा एक समाज आहे.
तबला हे भारतीय वाद्य नसावे कारण पर्शियन प्राचीन ग्रंथात "तबल-अल्गाविग,तबलजंग,तबला टर्की, तबलसामी-मिरगी, तबलबलादी" या वाद्यांचा समावेश आढळतो. त्यामुळे हे वाद्य भारता बाहेरून आले असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
इ.स. १२९६-१३१६ काळात अल्लाउद्दीन खिलजी च्या राज्यात "अमीर खुसरो" नावाचा एक अतिशय प्रतिभाशाली कलाकार होता. त्याने पर्शियन , इराणी आणि अफगाणी संगीताला भारतीय संगीताची जोड दिली आणि नवीन ठेके आणि वाद्यांची भर घातली. म्हणून अमीर खुसरो याने तबल्याची निर्मिती केली असे म्हणतात.
पण महाराष्ट्रामद्धे सुद्धा काही प्रचलित वाद्ये आढळतात जस की संबळ चौघडा. तसेच पुरातन शिल्प आणि चित्रांमधून सुधा तबला आढळून येतो त्यामुळे या वाद्यांचे परिवर्तन होऊन तबला निर्माण झाला असावा असा एक अंदाज आहे.
(टीप: कृपया आपल्याकडे काही माहिती असल्यास अथवा काही बदल सुचवायचे असल्यास कमेन्ट मध्ये नमूद करा.)
संदर्भ आणि सौजन्य : १. ताल निनाद (श्री विजय किरपेकर) २. शास्त्रीय तबला गाइड (गोपाळ सखाराम आणि कंपनी मुंबई)

No comments:
Post a Comment