तबला बैठक
नवीन तबला शिकणार्यांसाठी बैठकीची पद्धत
तबला वाजवताना सामान्यपणे मंडी घालून बसावे. समोर तबला उजव्या हाताला आणि डग्गा डाव्या हाताला थोडेसे अंतर ठेऊन मांडावा. तबला पुढच्या बाजूला किंचित तिरका तर डग्गा सरळ ठेवावा. डग्ग्याचे मैदान मोठा भाग आपल्या बाजूस ठेवावा व शाई चा भाग समोरील बाजूस ठेवावा.
रियाज (सराव) : कोणत्याही गोष्टीतील सातत्य आपल्याला यशाच्या जवळ नेते. तसेच उत्तम तबला वादक होण्यासाठी सातत्याने सराव आवश्यक आहे. सराव करताना काही गोष्टी विचारात घेणे महत्वाचे आहे.
१. रियाजसाठी एक वेळ ठरवून घ्यावी. (पहाटे केलेला रियाज उत्तम)
२. काळी १ स्वराचा तबला रियाजसाठी उत्तम
३. योग्य लेहरा घेऊन रियाज करावा.
४. बोल स्पष्ट वाजवण्याचा प्रयत्न करावा आणि वाजू लागल्यावर लय वाढवावी.
५. रियाज करताना बोल तोंडाने म्हणावेत (वाजवत असताना बोल म्हणणे कठीण असले तरी अशक्य नाही)
(टीप: कृपया आपल्याकडे काही माहिती असल्यास अथवा काही बदल सुचवायचे असल्यास कमेन्ट मध्ये नमूद करा.)
संदर्भ आणि सौजन्य : १. ताल निनाद (श्री विजय किरपेकर) २. शास्त्रीय तबला गाइड (गोपाळ सखाराम आणि कंपनी मुंबई)

No comments:
Post a Comment