तबल्याची ६ मुख्य घराणी आहेत
१. दिल्ली घराणे २. अजराडा घराणे
२. लखनौ घराणे ४. फरूखबाद घराणे
५.बनारस घराणे ६. पंजाब घराणे
१. दिल्ली घराणे २. अजराडा घराणे
२. लखनौ घराणे ४. फरूखबाद घराणे
५.बनारस घराणे ६. पंजाब घराणे
प्रत्येक घरण्यांनुसार आपण त्यांचा संक्षिप्त परिचय पाहू.
१. दिल्ली घराणे : हे तबल्याचे सर्वात पुरातन आणि प्रथम घराणे मानले जाते. उत्तर-पूर्व भारतात या घराण्याचा जास्त वारसा आढळतो तसेच आत्ताच्या काळात सर्वात जास्त वापरले जाणारे हे घराणे आहे. दिल्ली घराण्याची स्थापना १८ व्या शतकामध्ये उस्ताद सिद्धार खान धाडी यांनी केली. ज्यांना तबल्याचे निर्माते अथवा आद्य प्रवर्तक असे मानले जाते. मुळात सिद्धार खान हे पखवाज वादक होते त्यांनी पखवाजातील जवळ जवळ सर्व बोल तबल्यावर कसे वाजवता येतील या कडे पाहिले. तबल्यातील काही प्रमुख संकल्पना उदाहरणार्थ कायदा तसेच पेशकार यांच्या रचनेमध्ये त्यांचे अमूल्य योगदान आहे. या घराण्यात प्रामुख्याने पेशकार, रेले , कायदे यांचे वादन केले जाते."धीट,तिट,किट,धागेना,तागेना,तिनकिन,धिनगिन,धिरधिर" या बोलांचा मुख्यता वापर केला जातो. कायदे हे साधारण चतस्त्र जातीचे असतात. तबला व डग्गा यामधून कोमल नाद निर्माण केला जातो ज्याचा वेग खूप जास्त असतो. साथसंगत आणि स्वतंत्र तबला वादना साठी हे खूप उपयुक्त असे घराणे आहे.
२. अजराडा घराणे : दिल्ली घराण्याचे उ. सिताब खान यांचे शिष्य उ. मिरू खान व उ.कल्लू खान यांनी हे घराणे १९ व्या शतकामध्ये स्थापन केले. उत्तर प्रदेश मधील मेरठ जिल्ह्यामध्ये अजराडा नावाचे हे गाव जिथे उ.मिरू खान आणि उ.कल्लू खान स्थायिक झाले. दिल्ली घराण्याच्या गुरु परंपरेमुळे अजराडा आणि दिल्ली घराण्याच्या वादन शैली मध्ये विशेष असा काही फरक जाणवत नाही. पण या दोन्ही उस्ताद लोकांनी आड लईतील एक विशिष्ठ शैली विकसित केली आणि कायदे सुद्धा तिस्त्र जातीमधे बांधले. वादन शैली पहायची झाल्यास यामध्ये अंगठ्या जवळ चा मांसल भाग एका विशीष्ठ पद्धतीने डग्ग्यावर घासला जातो. ज्यामुळे एक विशीष्ठ प्रकारचा नाद तयार होतो जो आकर्षक वाटतो. हे या घराण्याचे वैशिष्ठ्य. या मध्ये प्रामुख्याने "घेतक, धिगन, तित, कत" या बोलांचा वापर आढळतो. अनवट कायद्याची रचना या घराण्यात आढळते. त्यामुळे या घराण्यातील स्वतंत्र तबला वादन अवघड मानले जाते.
(टीप: कृपया आपल्याकडे काही माहिती असल्यास अथवा काही बदल सुचवायचे असल्यास कमेन्ट मध्ये नमूद करा.)
संदर्भ आणि सौजन्य : १. ताल निनाद (श्री विजय किरपेकर) २. शास्त्रीय तबला गाइड (गोपाळ सखाराम आणि कंपनी मुंबई)
Wah
ReplyDelete